व्हेजिटेबल खिचडी




उद्याच्या मेनूसाठी खरेदी:

१. पाव, गाजर, फरसबी, टोमॅटो, लाल मिरच्या
२. कांदे, मटार, कोथिंबीरीची जुडी
३. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता
४ धने-जिरे पूड, गरम मसाला
५. लवंगा, तमालपत्र, सकाळचा नाश्ता : पाव वडा

जेवणाचा मेनू : 

लाल मिरची+कांदा+लसूण पातळ चटणी, मसाला पापड, कांद्याची पीठ पेरून भाजी, कढी, कोथिंबीरीच्या वड्या, •व्हेजिटेबल खिचडी, पोळ्या

व्हेजिटेबल खिचडी-साहित्य :

१. पाऊण वाटी तांदूळ
२. एक वाटीमूगाची डाळ, गाजर, फरसबीचे तुकडे
३. कांदा आणि बटाटा सगळं पातळ चिरून प्रत्येकी अर्धी ४. वाटी एक वाटी मटार दाणे
५. दोन टोमॅटो, कढीपत्ता, धने+जिरं पूड
६. दोन-तीन लवंगा, दोन पान तमालपत्र
७. अर्धा चमचा गरम मसाला
८. तेल

कृती : 

 अर्धा तास आधी डाळ, तांदूळ आणि भाज्या चिरून धुऊन ठेवाव्या. पातेल्यात दोन डाव तेल घेऊन हिंग+ मोहरी+हळदीची फोडणी करून त्यात तमालपत्र, लवंगा, कढीपत्ता घातल्यावर कांदा टाकून लालसर परतावे. नंतर डाळ-तांदूळ घालून परतावे. नंतर टोमॅटो, सर्व भाज्या घालून थोडे परतल्यावर त्यावर पाच वाट्या उकळीचे पाणी घालावे. त्यावर अर्धा चमचा धने-जिरे पूड, गरम मसाला, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर घालून उकळी आल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर खिचडी शिजवावी. घट्ट किंवा पातळ जशी हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालावे. साजूक तूप घालून सर्व्ह करावी.

No comments:

Post a Comment