Showing posts with label बंगाली फराळ. Show all posts
Showing posts with label बंगाली फराळ. Show all posts

देनार पायस







साहित्य :

  • दीड लिटर गाईचं दूध
  • २ टे. स्पू व्हिनेगर
  • दीड लिटर म्हशीचं दूध
  • २०० ग्रॅम साखर
  • २ टे. स्पू. ड्रायफ्रूट्सचे काप आणि वेलची पूड.

कृती :

  गाईचं दूध गरम करायला ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दुधात व्हिनेगर टाकून दूध फाडून त्याचं पनीर तयार करावं, पनीर परातीत घेऊन मळून अगदी गुळगुळीत करावं. त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून ठेवाव्या. म्हशीचं दूध आटवावं. दूध निम्म्यावर आल्यावर त्यात साखर घालावी. मंद आचेवर हलक्या हातानं ते ढवळावे. गॅस बंद करून त्यात वेलची पूड टाकावी. दूध थोडं कामट होत आल्यावर पनीरच्या गोळ्या त्यात टाकाव्या. देनार पायस हे खाण्यास देतेवेळी बाऊलमध्ये खीर टाकून वर ड्रायफ्रूटसचे काप पेराव.

केशरी संदेश




साहित्य :

  • १ लिटर गाईचं दूध
  • १ टे. स्पू. लिंबाचा रस
  • २ टे. स्पू. मिल्क पावडर
  • पनीरच्या निम्मी पिठीसाखर
  • केशरी रंग, केशरी इसेन्स
  • २ टे. स्पू. दह्याचा चक्का
  • चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे काप.

कृती :

   दूध गरम करावं. ते चांगलं गरम झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून ते नासवावं. लगेच पातळ कपड्यावर ओतून त्याची पटकन पुरचुंडी बांधून आणि ती चांगली दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. अशा प्रकारे पनीर तयार करावं. पनीर गरम असतानाच परातीत घेऊन ते खूप मळावं. मळल्यानंतर त्यात १ टे. स्पू मिल्क पावडर, पिठीसाखर, दह्याचा चक्का, केशरी रंग व इसेन्स घालून ते चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण संदेशच्या साच्यात किंवा पेपर कपमध्ये घालावं. चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे* काप वर ठेवून ते फ्रीजमध्ये गार करावं.

पाटीशप्त





साहित्य :

  • १०० ग्रॅम कणीक
  • १०० ग्रॅम रवा
  • ३ टे स्पू. तूप
  • भिजवण्यासाठी गरजेपुरत दूध
  • तळण्यासाठी तूप आणि सजावटीसाठी चांदीचा वर्ख सारणासाठी १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस
  • १०० ग्रॅम माया (खवा)
  • १०० ग्रॅम गूळ आणि वेलची पूड.

कृती :

     रवा आणि तीन टे. स्पू. तूप एक करावं, गरजेनुसार लागेल तेवढं दूध घालून चिरड्यांसाठी भिजवतो इतपत हे पीठ पातळसर भिजवावं. गूळ किसून घ्यावा. मावा, गूळ, खोबऱ्याचा कीस आणि वेलची पूड एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवावं. तव्यावर तूप घालून गरम करावं. तव्यावर पळीभर कणकेचं मिश्रण टाकून त्याचे लहान गोल धिरडे घालावे. धिरड्याच्या दोन्ही बाजूंनी थोडं तूप घालून दोन्ही बाजूंनी ते चांगलं शिजवावं. शिजलेलं धिरडं तव्यावरून काढून ताटात पसरून ठेवावं. चमचाभर सारण मध्यभागी ठेवून धिरड्याची गुंडाळी करावी. ही गुंडाळी ताटात ठेवून त्याला चांदीचा वर्ख लावावा.