साहित्य :
- १ लिटर गाईचं दूध
- १ टे. स्पू. लिंबाचा रस
- २ टे. स्पू. मिल्क पावडर
- पनीरच्या निम्मी पिठीसाखर
- केशरी रंग, केशरी इसेन्स
- २ टे. स्पू. दह्याचा चक्का
- चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे काप.
कृती :
दूध गरम करावं. ते चांगलं गरम झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून ते नासवावं. लगेच पातळ कपड्यावर ओतून त्याची पटकन पुरचुंडी बांधून आणि ती चांगली दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. अशा प्रकारे पनीर तयार करावं. पनीर गरम असतानाच परातीत घेऊन ते खूप मळावं. मळल्यानंतर त्यात १ टे. स्पू मिल्क पावडर, पिठीसाखर, दह्याचा चक्का, केशरी रंग व इसेन्स घालून ते चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण संदेशच्या साच्यात किंवा पेपर कपमध्ये घालावं. चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे* काप वर ठेवून ते फ्रीजमध्ये गार करावं.
best marathi recipes !
ReplyDelete