Showing posts with label दक्षिण भारतीय फराळ. Show all posts
Showing posts with label दक्षिण भारतीय फराळ. Show all posts

मनोहरम




(हा पदार्थ तामिळनाडूचा विशिष्ट पदार्थ आहे.)

साहित्य 

१०० ग्रॅम मुगाची डाळ
१०० ग्रॅम हरभरा डाळ
१०० ग्रॅम तांदूळ
२५० ग्रॅम गूळ
वेलची पूड
४ टे. स्पू. लोणी
चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल

कृती :

   तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यावे त्याची पिठी करावी दोन्ही डाळी मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्या गिरणीतून बारीक दळून आणाव्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून चाळून घ्यावं मीठ आणि लोणी घालून मिश्रण पाण्यानं घट्ट मळावं सोऱ्याला जाड भोकाची शेवेची प्लेट लावून सोऱ्यात भिजवलेल पीठ भरावं कढईत तेल तापवून शेव गरम तेलात तळून घ्यावी अर्धी वाटी पाण्यात गूळ टाकून उकळत ठेवावा सतत ढवळून त्याचा दोन तारी पाक तयार करावा. नंतर पाक गाळून घ्यावा गॅसवरून उतरवून पाकात वेलची पूड आणि तळलेली शेव टाकावी पाकातील शेव सतत ढवळावी म्हणजे ती पाकात चागली मिसळते ही शेव गार झाल्यावर डब्यात भरावी

कोदंबल्ली- (मद्रासी कडबोळी)





साहित्य :

२५० ग्रॅम तादळाचं पीठ
२ टे स्पू. लोणी
२-३ हिरव्या मिरच्या
८-१० कढीपत्त्याची पानं
२ टे. स्पू. बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ आणि हिंग
तळण्यासाठी खोबरेल तेल किंवा तूप

कृती :

  हिरव्या मिरच्यांची पेस्ट करावी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं बारीक कापून घ्यावेत. तांदळाच्या पिठात मीठ व लोणी घालून पीठ चोळून घ्यावं त्यात हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालून कोमट पाण्यानं पीठ भिजवाव पीठ चांगल मळून घ्याव केळीच्या पानाला तेल लावून पिठाची कडबोळी करावी. मद्रासी कडबोळी रिंगसारखी असते, कढईत तूप किंवा तेल तापवून कडकडीत करावं. मग गॅस कमी करून कडबोळी बदामी रंगावर तळावी. या कडबोळी कुरकुरीत होतात आणि बरेच दिवस टिकतात.

गोड चकली





साहित्य :

 २५० ग्रॅम तांदळाचं पीठ
 अर्धी वाटी जाड पोहे
 अर्धी वाटी मुगाची डाळ
 चवीपुरतं मीठ
 दोन टे. स्पू. लोणी
 ११ टे स्पू. तीळ
 १ वाटी किसलेला गूळ
 वेलची पूड, सुंठपूड
 गरजेनुसार दूध आणि तळण्यासाठी तूप
 
कृती :

   मुगाची डाळ धुवून कमी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी, पोहे धुवून पिळून पाणी काढून टाकावे, परातीत तादळाच पीठ घेऊन त्यात भिजवलेले पोहे, शिजलेली मूग डाळ एकत्र करावी त्यात किसलेला गूळ, वेलची पूड, सुठपूड, चिमूटभर मीठ, तीळ आणि लोणी घालावे. मिश्रण कोरड वाटल्यास थोड़ दूध टाकून पिठाप्रमाणेच पीठ तयार कराव पीठ चांगल एकजीव झाल्यावर चकलीच्या सोऱ्यात घालून त्याच्या चकल्या पाडाव्या. तूप तापवून कडकडीत तुपात चकल्या टाकाव्यात. मंद आचेवर चकल्या बदामी रंगावर तळून काढाव्यात.

या चकल्या विशेष करून म्हैसूरमध्ये केल्या जातात!

मुरुकू






साहित्य : 

५०० ग्रॅम तांदूळ
२५० ग्रॅम उडीद
१ टे स्पू जिरे
१ टे स्पू. तीळ, हिंग
४ टे स्पू. पांढरे लोणी, मीठ
तळण्यासाठी खोबरेल तेल किंवा आपल्या आवडीप्रमाणे कोणतंही खाण्याचं तेल.

कृती :

  तांदूळ धुवून वाळवून थोडे भाजून घ्यावे, मग भिजवून ठेवावे अर्ध्या तासानं तांदूळ उपसून निथळत ठेवावे कमीत कमी प्राण्यात वाटून घ्यावे उडीद डाळ कोरडीच बदामी रंगावर भाजून घ्यावी त्याचा मिक्सरमधून बारीक रवा करावा तांदळाची पिठी, उडीद डाळीचा रवा, जिरे, हिंग, तीळ आणि मीठ एकत्र करून त्यात लोणी मिक्स करावं मग गरजेनुसार त्यात पाणी घालून मिश्रण सैलसर भिजवाव प्रथम हाताला तेल लावावं पिठाची लिंबाएवढी गोळी घेऊन ती थोडी लांबट ओढून घ्यावी पिठाची लिंबाएवढी गोळी घेऊन हाताला तेल लावून थोडी लांबट करून ओढावी नंतर दोन्ही हातानी पीळ द्यावा असे करून चकलीप्रमाणे दोन-तीन वेढे घालावे याप्रकारे आधी मुरुक्कू तयार करून ठेवावे आणि नंतर कढईत तेल तापवून बदामी रंगावर तळावे




सुरळी होलिगी



(कर्नाटकातला हा अगदी विशेष पदार्थ आहे. )

साहित्य :

पारीसाठी २ वाटी मैदा
१ वाटी रवा
चिमूटभर मीठ आणि २ टे स्पू पातळ तूप

सारणासाठी :

  १ वाटी डाळ्या
  अर्धी वाटी पिठीसाखर
  अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  वेलची पूड आणि खसखस

कृती :

  खसखस भाजून घ्यावी, डाळ्या, खसखस, पिठीसाखर, खोबऱ्याचे कीस आणि वेलची पूड सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावं मैदा, रवा, मीठ आणि तूप परातीत घेऊन पाण्यानं घट्ट भिजवावं पीठ भिजवून दोन तास झाकून ठेवावं पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन पातळ लाटावा त्यावर तयार केलेलं सारण मधोमध ठेवावं. सारण सर्व बाजूंनी सारखं करून पारीची एक इंचाची सुरळी तयार करावी सुरळीची दोन्ही टोके दाबून बद करावी सुरळीला हातानं दाब देऊन ती थोडी पसरवून घ्यावी सर्व सुरळ्या तयार करून तव्यावर दाबून शेकून घ्याव्या किंवा गरम तुपात मध्यम आचेवर तळाव्या त्या बरेच दिवस टिकतात