चंद्रपुरी वडाभात




साहित्य:

१. प्रत्येकी अर्धी वाटी चणा
२. व मटकी डाळ
३. मूठभर तांदूळ, तूर, लाख
४. दोन वाट्या बासमती तांदूळ
५. आले, हिरवी मिरची, आठ लसूण पाकळ्या
६. कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, ओवा, तीळ, तेल
७. गोड ताक, लिंबाचे लोणचे, पापड.

कृती : 

 प्रथम सर्व डाळी वेगवेगळ्या भांड्यांत भिजत घाला. (४ तास) भिजल्यानंतर स्वच्छ धुऊन चाळणीत निथळायला ठेवा. निथळल्यावर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. (फार बारीक नाही.) वाटताना त्यात आले, हिरवी मिरची, कढीपत्ता घाला (आवडीनुसार). वाटून झाल्यावर त्यात गरम तेलाचे मोहन, हिंग, हळद, मीठ, ओवा, तीळ घालून चांगले फेटून घ्या. तेलाचा हात लावून चपटे वडे थापा व मंद आचेवर वडे तळून घ्या. बासमती तांदळाचा कमी पाणी घालून भात शिजवून घ्या. शिजताना मीठ व थोडी हळद घाला. हिंगाच्या फोडणीचे तेल करा.
गरम भातावर वडे कुस्करून त्यावर हिंगाच्या फोडणीचे तेल घ्या. भाताबरोबर गोड ताक, लिंबाचे लोणचे, पापड घ्या.

No comments:

Post a Comment