Upvasacha shira (वरी तांदुळाचा शिरा )

vari tandulacha shira



उद्याच्या मेनूसाठी खरेदी- 

१. भगर, सफरचंद, मेथीची जुडी, चवळी
२. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर
३. कढीपत्ता, वेलची, केशर, बेदाणे
४. काजू किंवा बदाम .

उद्यासाठी आजची तयारी :
चवळी भिजत घालणे 

सकाळचा नाश्ता:
वरी तांदूळाचा शिरा

जेवणाचा मेनू:

 सफरचंदाच गोड लोणचं, शेंगदाणा सॅलड, मेथी+बेसन पीठ पेरून कोरडी भाजी, कढी, चवळीची उसळ, साधा भात पोळ्या.
 
वरी तांदूळाचा शिरा 

 साहित्य
   
१. एक वाटी वरी तांदूळ
२. दोन वाट्या पाणी
३. दीड वाटी दूध
४. पाऊण वाटी साखर, एक चिमूटभर मीठ
५. दोन टेबलस्पून तूप
६. चार वेलची
७. दहा-बारा बेदाणे, चिमूटभर केशर

कृती 

 दूध, पाणी आणि केशर एकत्र करून गरम करत ठेवावे. कढईत तूप घेऊन ते तापल्यावर त्यावर वरीचे तांदूळ घालून परतावे. त्यावर उकळलेले दूध पाणी ओतावे. मिश्रण हलवून मंद गॅसवर शिजू द्यावे. पाणी पूर्णपणे सुकल्यावर त्यात साखर, चिमूटभर मीठ, वेलची पावडर बेदाणे घालून चांगले हलवून घ्यावे. पुन्हा चार-पाच मिनिटे मंद-गॅसवर शिजवून घ्यावे. सर्व्ह करताना वरून काजू किंवा बदामाचे काप घालावे.




No comments:

Post a Comment