साहित्य:
- दोन वाट्या जाड पोहे
- एक वाटी कांदा बारीक चिरून
- तीन-चार हिरव्या मिरच्या • आठ-दहा कढीलिंबाची पान
- एक चमचा लिंबाचा रस
- चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
- मीठ, साखर, तीन मोठे चमचे तेल
- फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद
कृती:
- फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पान शेंगदाणे घालून परतून घ्यावे .
- त्यावर कांदा घालून परतावा.
- लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .
- पोहे, मीठ, साखर घालून परतून गार झाल्यावर डव्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
- पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव.
- मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात.
No comments:
Post a Comment