साहित्य:
- २ कप पोहे
- १ बटाटा
- २ कांदे
- ३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- कढीपत्ता
- ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
- १ लिंबू
- १ चमचा साखर
- पाव चमचा हिंग
- अर्धा चमचा मोहरी
- २ मोठे चमचे तेल
- पाव चमचा हळद
- मीठ
कृती:
- पोहे निवडून धूवून घ्या असे करण्यासाठी एक गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा.
- दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल .गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका.
- नंतर बटाटा व कांदा टाका झाकून पाच मिनिटे शिजू द्या.
- बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे|तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा.
- आता हळद आणि पोहे टाका तीन-चार मिनिट हलवा. उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा
- बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटारवापरल्यास छान लागतात
No comments:
Post a Comment