मदूर वडा



साहित्य :

 १ वाटी तांदुळाचे पीठ
 अर्धी वाटी रवा, १ वाटी मैदा
 १ डाव हरभऱ्याची डाळ
 १ कांदा, ७-८ हिरव्या मिरच्या
 १ डाव दाण्याचे कुट, १ इंच आले
 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
 २ डाव खवलेला नारळ
 २ डाव गरम तेंलाचे मोहन
 मीठ

कृती :

  आदल्या दिवशी रात्री १ डाव हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरवर बारीक वाटावी रवां कोरडा भाजून कांदा लांबट चिरावा. आलं, हिरव्या मिरच्यांचे वाटण करावे. एका मोठ्या बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ, मैदा, रवा, वाटलेली हरभऱ्याची डाळ, लांबट चिरलेला कांदा, मिरची आल्याच वाटण, चिरलेली कोथिंबीर, चवीपुरत मीठ, दोन डाव गरम तेलाचे मोहन घालून सर्व एकत्र कालवावे. वडे थापता येतील इतपत पाणी घालून पीठ भिजवावे प्लास्टिकच्या कागदावर बेताच्या आकाराचे वडे थापून कढईत तेल गरम करून गोल्डन ब्राऊन रगाचे वडे तळावेत. नारळाच्या चटणीबरोबर गरम सर्व्ह करावे.

No comments:

Post a Comment