इंद्रधनुषी करंज्या

 


साहित्य :

एक वाटी रवा
एक वाटी मैदा
एक नारळ
दोन वाट्या साखर
एक चमचा तांदळाची पिठी
अर्धी वाटी तूप
पाच चमचे कॉर्नफ्लोअर
 दूध, वेलची पूड
 गुलाबाचा इसेन्स हवे ते खाण्याचे रंग.

कृती :

 नारळ (ओले) खोवून घेऊन खोबरे आणि साखर एकत्र शिजवावे. शिजत आल्यावर त्यात एक चमचा तांदळाची पिठी घालून पूर्ण शिजवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पूड व गुलाबाचा इसेन्स घालावा व सारण तपार करून ठेवावे. स्वा व मैदा एकत्र करून त्यात चार चमचे तूप मिसळावे. त्या पिठाचे दोन भाग करावेत. एका भागात हवा असेल तो खाण्याचा रंग घालावा व दोन्ही भाग दुधात किंवा पाण्यात वेगवेगळे घट्ट भिजवावे. दोन तासानंतर ते गोळे कुटून घ्यावेत, अर्धी वाटी तूप घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर चांगले फेसून घ्यावे.
      पांढऱ्या पिठाच्या गोळ्याचा चार लहान गोळ्या कराव्यात. तसेच रंगीत पिठाच्या गोळ्याच्याही चार गोळ्या कराव्या. नंतर पांढरी एक गोळी घेऊन ती लाटून त्यावर फेसलेले कॉर्नफ्लोअर लावावे. रंगीत गोळीची पोळी लाटून ती पांढऱ्या पोळीवर पसरावी व रंगीत पोळी वर कॉर्नफ्लोअर लावावे. याप्रमाणे चार रंगीत पोळ्या कॉर्नफ्लोअर लावलेल्या चार पांढन्या पोळीवर पसरवून, प्रत्येकीवर कॉर्नफ्लोअर लावून त्या सर्व पोळ्यांची मिळून गुंडाळी करावी. ती गुंडाळी लांबीच्या बाजूने कापून दोन भाग करावेत व ते पुन्हा आडवे कापून दोन-दोन इंचाचे तुकडे करावेत. एक तुकडा घेऊन ज्याचे पदर दिसतात. ती बाजू पोळपाटाकडे करून गोळी पुरीसारखी लाटावी. त्यात वर तयार केलेले सारण भरून दोन्ही बाजू दाबून बंद करून कातणीने कातून मंद तुपात तळावी. पांढऱ्या व रंगीत अशा मिश्र पट्ट्यामुळे या आकर्षक दिसतात.
     वर एकच रंग घालण्याबद्दल दिले आहे. त्याऐवजी रे घालण्याकरिता जो पिठाचा भाग बाजूला काढलेला असेल. त्या भागाचे पुन्हा चार भाग करावेत व त्या प्रत्येक भागात निरनिराळे चार रंग घालावेत व चारही गोळ्यांच्या निरनिराळ्या पोळ्या लाटून एक पांढरी व दुसरीदुसऱ्या रंगाची, अशा सर्व पोळ्या एकमेकावर पसरवून करंज्या कराव्यात. या करंजीला निरनिराळ्या रंगाच्या पट्टेवजा छटा आल्यामुळे, करंजी इंद्रधनुष्याप्रमाणे दिसेल. रंगाच्या विविधतेमुळे या करंज्या फार आकर्षक दिसतात. याप्रकारच्या करंज्या अतिशय खुसखुशीत होतात. दिवाळीला या आकर्षक शोभिवंत रंगीत करंज्या सर्वांना खचितच आवडतील. साध्या करंज्या नेहमीच करतो. म्हणून या नाविन्यपूर्ण करंज्या जरूर करा.

No comments:

Post a Comment