साहित्य :
- दीड वाटी रवा,
- अर्धी वाटी साय/क्रीम,
- अर्धी वाटी ताजे दही,
- सोडा,
- पाऊण वाटी साखर,
- २ चमचे ड्रायफ्रूट,
- व्हॅनिला इसेन्स,
- टुटीफ्रुटी.
कृती:
रवा पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात साय, दही, साखर घाला. हँडमिक्सीने मिश्रण फेटा. इसेन्स, सोडा घालून पुन्हा फेटा. ड्रायफ्रूट घाला. टुटीफ्रुटी घाला. केकपात्रात घालून १५-२० मि. केक ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये भाजून घ्या. थंड झाल्यावर खायला द्या.
No comments:
Post a Comment