साहित्य :
१. सारणाचे ओले वाटाणे (मटारचे दाणे) दीड वाटी
२. किसलेले खोबरे दोन टेबलस्पून
३. मीठ अंदाजे, लसूण ५ ते ६ पाकळ्या
४. गरम मसाला १ चमचा, हिरव्या मिरच्या ३ ते ४
५. लिंबू अर्धे, १ साखर टे.स्पून
६. तेल तळण्यासाठी व फोडणीसाठी.
पारीसाठी :
उकडलेला बटाटा किसून दीड वाटी, डाळीचे पीठ दोन टे.स्पून, किसलेले आले १ टे.स्पून, ओल्या मिरच्या चार, मीठ चवीनुसार.
कृती (सारण) :
वाटाणा अर्धवट बारीक करून घ्यावा. नंतर त्यात लसूण, मिरची, आले वाटून घालावे. तेलाची फोडणी करून त्यात वाटाणा मिश्रण, मीठ, गरम मसाला, साखर, खोबरे (किसलेले) घालावे व मिश्रण चांगले परतावे.
(पारी) :
बटाट्याच्या किसात मीठ, आले-मिरची पेस्ट, डाळीचे पीठ घालून मिश्रण एकजीव करावे. या पिठाच्या पाऱ्या कराव्यात. एका पारीवर सारण घालावे, वर दुसरी पारी ठेवून दोन्ही बाजू बंद कराव्यात किंवा मुरड घालून छान डिझाइनही करता येते मंद आचेवर कचोरी तळावी. कचोरी खाण्यास तयार. चटणी सॉसबरोबर खावी.
No comments:
Post a Comment