देनार पायस







साहित्य :

  • दीड लिटर गाईचं दूध
  • २ टे. स्पू व्हिनेगर
  • दीड लिटर म्हशीचं दूध
  • २०० ग्रॅम साखर
  • २ टे. स्पू. ड्रायफ्रूट्सचे काप आणि वेलची पूड.

कृती :

  गाईचं दूध गरम करायला ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दुधात व्हिनेगर टाकून दूध फाडून त्याचं पनीर तयार करावं, पनीर परातीत घेऊन मळून अगदी गुळगुळीत करावं. त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून ठेवाव्या. म्हशीचं दूध आटवावं. दूध निम्म्यावर आल्यावर त्यात साखर घालावी. मंद आचेवर हलक्या हातानं ते ढवळावे. गॅस बंद करून त्यात वेलची पूड टाकावी. दूध थोडं कामट होत आल्यावर पनीरच्या गोळ्या त्यात टाकाव्या. देनार पायस हे खाण्यास देतेवेळी बाऊलमध्ये खीर टाकून वर ड्रायफ्रूटसचे काप पेराव.

काबुली सॅलड .

 




साहित्य : 

एक वाटी शिजवलेले काबुली चणे. 

कृती : 

शिजवलेले काबुली चणे, एक बारीक चिरलेली काकडी, कांदापात, (हिरवी, लाल किंवा पिवळी) ढोबळी मिरची (जी आपल्याला मिळेल तिच्या बारीक फोडी), सॅलडची पाने, हे सर्व मिक्स करणे. त्यात लिंबूरस, जिरेपूड, मिरपूड आणि मीठ घालणे. सॅलड बाऊलमध्ये घालून वरती लालबुंद टोमॅटोच्या चकत्या ठेवून सुशोभित करणे.




काबुली टिक्की .





साहित्य : 

१ . एक कप शिजवलेले काबुली चणे
२ . तीन उकडलेले बटाटे
३ . हिरवी मिरची-आले पेस्ट
४ . मिरपूड,लिंबाचा रस, मीठ.

कृती : 

काबुली चणे, उकडलेले बटाटे बारीक करून घेणे (हातांनी), त्यात हिरवी मिरची, आले पेस्ट, मिरपूड, लिंबाचा रस, कोथिंबीर व मीठ घालून चांगले मळून घेणे. मिश्रणाचे चपटे वडे करून कटलेटप्रमाणे शॅलो फ्राय करणे.

  ही टिक्की चटणी किंवा सॉसबरोबर स्वादिष्ट लागते.





केशरी संदेश




साहित्य :

  • १ लिटर गाईचं दूध
  • १ टे. स्पू. लिंबाचा रस
  • २ टे. स्पू. मिल्क पावडर
  • पनीरच्या निम्मी पिठीसाखर
  • केशरी रंग, केशरी इसेन्स
  • २ टे. स्पू. दह्याचा चक्का
  • चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे काप.

कृती :

   दूध गरम करावं. ते चांगलं गरम झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून ते नासवावं. लगेच पातळ कपड्यावर ओतून त्याची पटकन पुरचुंडी बांधून आणि ती चांगली दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. अशा प्रकारे पनीर तयार करावं. पनीर गरम असतानाच परातीत घेऊन ते खूप मळावं. मळल्यानंतर त्यात १ टे. स्पू मिल्क पावडर, पिठीसाखर, दह्याचा चक्का, केशरी रंग व इसेन्स घालून ते चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण संदेशच्या साच्यात किंवा पेपर कपमध्ये घालावं. चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे* काप वर ठेवून ते फ्रीजमध्ये गार करावं.

पाटीशप्त





साहित्य :

  • १०० ग्रॅम कणीक
  • १०० ग्रॅम रवा
  • ३ टे स्पू. तूप
  • भिजवण्यासाठी गरजेपुरत दूध
  • तळण्यासाठी तूप आणि सजावटीसाठी चांदीचा वर्ख सारणासाठी १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस
  • १०० ग्रॅम माया (खवा)
  • १०० ग्रॅम गूळ आणि वेलची पूड.

कृती :

     रवा आणि तीन टे. स्पू. तूप एक करावं, गरजेनुसार लागेल तेवढं दूध घालून चिरड्यांसाठी भिजवतो इतपत हे पीठ पातळसर भिजवावं. गूळ किसून घ्यावा. मावा, गूळ, खोबऱ्याचा कीस आणि वेलची पूड एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवावं. तव्यावर तूप घालून गरम करावं. तव्यावर पळीभर कणकेचं मिश्रण टाकून त्याचे लहान गोल धिरडे घालावे. धिरड्याच्या दोन्ही बाजूंनी थोडं तूप घालून दोन्ही बाजूंनी ते चांगलं शिजवावं. शिजलेलं धिरडं तव्यावरून काढून ताटात पसरून ठेवावं. चमचाभर सारण मध्यभागी ठेवून धिरड्याची गुंडाळी करावी. ही गुंडाळी ताटात ठेवून त्याला चांदीचा वर्ख लावावा.





पोहे




साहित्य:
  • दोन वाट्या जाड पोहे 
  • एक वाटी कांदा बारीक चिरून
  • तीन-चार हिरव्या मिरच्या • आठ-दहा कढीलिंबाची पान
  • एक चमचा लिंबाचा रस
  • चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
  • मीठ, साखर, तीन मोठे चमचे तेल
  • फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

कृती:

  • फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पान शेंगदाणे घालून परतून घ्यावे . 
  • त्यावर कांदा घालून परतावा. 
  • लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .
  •  पोहे, मीठ, साखर घालून परतून गार झाल्यावर डव्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. 
  •  पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव.
  • मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात.

बटाटा पोहे



साहित्य:
  • २ कप पोहे
  • १ बटाटा
  • २ कांदे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
  • १ लिंबू
  • १ चमचा साखर
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा मोहरी
  • २ मोठे चमचे तेल
  • पाव चमचा हळद
  • मीठ

कृती:
  •  पोहे निवडून धूवून घ्या असे करण्यासाठी एक गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा.
  • दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल .गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका. 
  • नंतर बटाटा व कांदा टाका झाकून पाच मिनिटे शिजू द्या. 
  •  बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे|तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा. 
  •  आता हळद आणि पोहे टाका तीन-चार मिनिट हलवा.  उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा 
  • बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटारवापरल्यास छान लागतात

भेळ पोहे




साहित्य:

  •  ५-६ वाट्या पातळ पोहे 
  • आतपाव खारे दाणे
  • ५० ग्रॅम शेव
  •  ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धे लिंबू
  • २ मध्यम कांदे 
  • थोडी कोथिंबीर
  •  खोबरे
  • साखर
  • मीठ

कृती:

• तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू .
    नये.)
• नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत. 
• चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.
• कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन
    भेळेसारखे कालवावे.
• ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते.
• चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

बिनाअंड्याचा रवा केक



साहित्य : 

  • दीड वाटी रवा, 
  • अर्धी वाटी साय/क्रीम, 
  • अर्धी वाटी ताजे दही,
  •  सोडा, 
  • पाऊण वाटी साखर, 
  • २ चमचे ड्रायफ्रूट, 
  • व्हॅनिला इसेन्स, 
  • टुटीफ्रुटी.

कृती:

 रवा पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात साय, दही, साखर घाला. हँडमिक्सीने मिश्रण फेटा. इसेन्स, सोडा घालून पुन्हा फेटा. ड्रायफ्रूट घाला. टुटीफ्रुटी घाला. केकपात्रात घालून १५-२० मि. केक ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये भाजून घ्या. थंड झाल्यावर खायला द्या.

मनोहरम




(हा पदार्थ तामिळनाडूचा विशिष्ट पदार्थ आहे.)

साहित्य 

१०० ग्रॅम मुगाची डाळ
१०० ग्रॅम हरभरा डाळ
१०० ग्रॅम तांदूळ
२५० ग्रॅम गूळ
वेलची पूड
४ टे. स्पू. लोणी
चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल

कृती :

   तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यावे त्याची पिठी करावी दोन्ही डाळी मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्या गिरणीतून बारीक दळून आणाव्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून चाळून घ्यावं मीठ आणि लोणी घालून मिश्रण पाण्यानं घट्ट मळावं सोऱ्याला जाड भोकाची शेवेची प्लेट लावून सोऱ्यात भिजवलेल पीठ भरावं कढईत तेल तापवून शेव गरम तेलात तळून घ्यावी अर्धी वाटी पाण्यात गूळ टाकून उकळत ठेवावा सतत ढवळून त्याचा दोन तारी पाक तयार करावा. नंतर पाक गाळून घ्यावा गॅसवरून उतरवून पाकात वेलची पूड आणि तळलेली शेव टाकावी पाकातील शेव सतत ढवळावी म्हणजे ती पाकात चागली मिसळते ही शेव गार झाल्यावर डब्यात भरावी