देनार पायस







साहित्य :

  • दीड लिटर गाईचं दूध
  • २ टे. स्पू व्हिनेगर
  • दीड लिटर म्हशीचं दूध
  • २०० ग्रॅम साखर
  • २ टे. स्पू. ड्रायफ्रूट्सचे काप आणि वेलची पूड.

कृती :

  गाईचं दूध गरम करायला ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दुधात व्हिनेगर टाकून दूध फाडून त्याचं पनीर तयार करावं, पनीर परातीत घेऊन मळून अगदी गुळगुळीत करावं. त्याच्या लहान लहान गोळ्या बनवून ठेवाव्या. म्हशीचं दूध आटवावं. दूध निम्म्यावर आल्यावर त्यात साखर घालावी. मंद आचेवर हलक्या हातानं ते ढवळावे. गॅस बंद करून त्यात वेलची पूड टाकावी. दूध थोडं कामट होत आल्यावर पनीरच्या गोळ्या त्यात टाकाव्या. देनार पायस हे खाण्यास देतेवेळी बाऊलमध्ये खीर टाकून वर ड्रायफ्रूटसचे काप पेराव.

काबुली सॅलड .

 




साहित्य : 

एक वाटी शिजवलेले काबुली चणे. 

कृती : 

शिजवलेले काबुली चणे, एक बारीक चिरलेली काकडी, कांदापात, (हिरवी, लाल किंवा पिवळी) ढोबळी मिरची (जी आपल्याला मिळेल तिच्या बारीक फोडी), सॅलडची पाने, हे सर्व मिक्स करणे. त्यात लिंबूरस, जिरेपूड, मिरपूड आणि मीठ घालणे. सॅलड बाऊलमध्ये घालून वरती लालबुंद टोमॅटोच्या चकत्या ठेवून सुशोभित करणे.




काबुली टिक्की .





साहित्य : 

१ . एक कप शिजवलेले काबुली चणे
२ . तीन उकडलेले बटाटे
३ . हिरवी मिरची-आले पेस्ट
४ . मिरपूड,लिंबाचा रस, मीठ.

कृती : 

काबुली चणे, उकडलेले बटाटे बारीक करून घेणे (हातांनी), त्यात हिरवी मिरची, आले पेस्ट, मिरपूड, लिंबाचा रस, कोथिंबीर व मीठ घालून चांगले मळून घेणे. मिश्रणाचे चपटे वडे करून कटलेटप्रमाणे शॅलो फ्राय करणे.

  ही टिक्की चटणी किंवा सॉसबरोबर स्वादिष्ट लागते.





केशरी संदेश




साहित्य :

  • १ लिटर गाईचं दूध
  • १ टे. स्पू. लिंबाचा रस
  • २ टे. स्पू. मिल्क पावडर
  • पनीरच्या निम्मी पिठीसाखर
  • केशरी रंग, केशरी इसेन्स
  • २ टे. स्पू. दह्याचा चक्का
  • चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे काप.

कृती :

   दूध गरम करावं. ते चांगलं गरम झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालून ते नासवावं. लगेच पातळ कपड्यावर ओतून त्याची पटकन पुरचुंडी बांधून आणि ती चांगली दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. अशा प्रकारे पनीर तयार करावं. पनीर गरम असतानाच परातीत घेऊन ते खूप मळावं. मळल्यानंतर त्यात १ टे. स्पू मिल्क पावडर, पिठीसाखर, दह्याचा चक्का, केशरी रंग व इसेन्स घालून ते चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण संदेशच्या साच्यात किंवा पेपर कपमध्ये घालावं. चांदीचा वर्ख आणि पिस्त्याचे* काप वर ठेवून ते फ्रीजमध्ये गार करावं.

पाटीशप्त





साहित्य :

  • १०० ग्रॅम कणीक
  • १०० ग्रॅम रवा
  • ३ टे स्पू. तूप
  • भिजवण्यासाठी गरजेपुरत दूध
  • तळण्यासाठी तूप आणि सजावटीसाठी चांदीचा वर्ख सारणासाठी १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा बारीक कीस
  • १०० ग्रॅम माया (खवा)
  • १०० ग्रॅम गूळ आणि वेलची पूड.

कृती :

     रवा आणि तीन टे. स्पू. तूप एक करावं, गरजेनुसार लागेल तेवढं दूध घालून चिरड्यांसाठी भिजवतो इतपत हे पीठ पातळसर भिजवावं. गूळ किसून घ्यावा. मावा, गूळ, खोबऱ्याचा कीस आणि वेलची पूड एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवावं. तव्यावर तूप घालून गरम करावं. तव्यावर पळीभर कणकेचं मिश्रण टाकून त्याचे लहान गोल धिरडे घालावे. धिरड्याच्या दोन्ही बाजूंनी थोडं तूप घालून दोन्ही बाजूंनी ते चांगलं शिजवावं. शिजलेलं धिरडं तव्यावरून काढून ताटात पसरून ठेवावं. चमचाभर सारण मध्यभागी ठेवून धिरड्याची गुंडाळी करावी. ही गुंडाळी ताटात ठेवून त्याला चांदीचा वर्ख लावावा.





पोहे




साहित्य:
  • दोन वाट्या जाड पोहे 
  • एक वाटी कांदा बारीक चिरून
  • तीन-चार हिरव्या मिरच्या • आठ-दहा कढीलिंबाची पान
  • एक चमचा लिंबाचा रस
  • चवीला एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे
  • मीठ, साखर, तीन मोठे चमचे तेल
  • फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

कृती:

  • फोडणीसाठी तेल गरम सरून त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीलिंबाची पान शेंगदाणे घालून परतून घ्यावे . 
  • त्यावर कांदा घालून परतावा. 
  • लिंबाचा रस घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावा .
  •  पोहे, मीठ, साखर घालून परतून गार झाल्यावर डव्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. 
  •  पोहे करायच्या वेळी एक वाटी मिश्रणाला अर्धी वाटी पाणी घालून पाच मिनिटं भिजू द्याव.
  • मग मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर एक वाफ आणावी . दोन प्लेट पोहे होतात.

बटाटा पोहे



साहित्य:
  • २ कप पोहे
  • १ बटाटा
  • २ कांदे
  • ३ हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता
  • ४ चमचे मोठे किसलेले खोबरे
  • १ लिंबू
  • १ चमचा साखर
  • पाव चमचा हिंग
  • अर्धा चमचा मोहरी
  • २ मोठे चमचे तेल
  • पाव चमचा हळद
  • मीठ

कृती:
  •  पोहे निवडून धूवून घ्या असे करण्यासाठी एक गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा.
  • दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल .गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका. 
  • नंतर बटाटा व कांदा टाका झाकून पाच मिनिटे शिजू द्या. 
  •  बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे|तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा. 
  •  आता हळद आणि पोहे टाका तीन-चार मिनिट हलवा.  उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा 
  • बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटारवापरल्यास छान लागतात

भेळ पोहे




साहित्य:

  •  ५-६ वाट्या पातळ पोहे 
  • आतपाव खारे दाणे
  • ५० ग्रॅम शेव
  •  ३-४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धे लिंबू
  • २ मध्यम कांदे 
  • थोडी कोथिंबीर
  •  खोबरे
  • साखर
  • मीठ

कृती:

• तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू .
    नये.)
• नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत. 
• चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.
• कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन
    भेळेसारखे कालवावे.
• ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते.
• चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

बिनाअंड्याचा रवा केक



साहित्य : 

  • दीड वाटी रवा, 
  • अर्धी वाटी साय/क्रीम, 
  • अर्धी वाटी ताजे दही,
  •  सोडा, 
  • पाऊण वाटी साखर, 
  • २ चमचे ड्रायफ्रूट, 
  • व्हॅनिला इसेन्स, 
  • टुटीफ्रुटी.

कृती:

 रवा पॅनमध्ये भाजून घ्या. त्यात साय, दही, साखर घाला. हँडमिक्सीने मिश्रण फेटा. इसेन्स, सोडा घालून पुन्हा फेटा. ड्रायफ्रूट घाला. टुटीफ्रुटी घाला. केकपात्रात घालून १५-२० मि. केक ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये भाजून घ्या. थंड झाल्यावर खायला द्या.

मनोहरम




(हा पदार्थ तामिळनाडूचा विशिष्ट पदार्थ आहे.)

साहित्य 

१०० ग्रॅम मुगाची डाळ
१०० ग्रॅम हरभरा डाळ
१०० ग्रॅम तांदूळ
२५० ग्रॅम गूळ
वेलची पूड
४ टे. स्पू. लोणी
चिमूटभर मीठ आणि तळण्यासाठी तेल

कृती :

   तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्यावे त्याची पिठी करावी दोन्ही डाळी मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्या गिरणीतून बारीक दळून आणाव्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून चाळून घ्यावं मीठ आणि लोणी घालून मिश्रण पाण्यानं घट्ट मळावं सोऱ्याला जाड भोकाची शेवेची प्लेट लावून सोऱ्यात भिजवलेल पीठ भरावं कढईत तेल तापवून शेव गरम तेलात तळून घ्यावी अर्धी वाटी पाण्यात गूळ टाकून उकळत ठेवावा सतत ढवळून त्याचा दोन तारी पाक तयार करावा. नंतर पाक गाळून घ्यावा गॅसवरून उतरवून पाकात वेलची पूड आणि तळलेली शेव टाकावी पाकातील शेव सतत ढवळावी म्हणजे ती पाकात चागली मिसळते ही शेव गार झाल्यावर डब्यात भरावी

कोदंबल्ली- (मद्रासी कडबोळी)





साहित्य :

२५० ग्रॅम तादळाचं पीठ
२ टे स्पू. लोणी
२-३ हिरव्या मिरच्या
८-१० कढीपत्त्याची पानं
२ टे. स्पू. बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ आणि हिंग
तळण्यासाठी खोबरेल तेल किंवा तूप

कृती :

  हिरव्या मिरच्यांची पेस्ट करावी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं बारीक कापून घ्यावेत. तांदळाच्या पिठात मीठ व लोणी घालून पीठ चोळून घ्यावं त्यात हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि हिंग घालून कोमट पाण्यानं पीठ भिजवाव पीठ चांगल मळून घ्याव केळीच्या पानाला तेल लावून पिठाची कडबोळी करावी. मद्रासी कडबोळी रिंगसारखी असते, कढईत तूप किंवा तेल तापवून कडकडीत करावं. मग गॅस कमी करून कडबोळी बदामी रंगावर तळावी. या कडबोळी कुरकुरीत होतात आणि बरेच दिवस टिकतात.

गोड चकली





साहित्य :

 २५० ग्रॅम तांदळाचं पीठ
 अर्धी वाटी जाड पोहे
 अर्धी वाटी मुगाची डाळ
 चवीपुरतं मीठ
 दोन टे. स्पू. लोणी
 ११ टे स्पू. तीळ
 १ वाटी किसलेला गूळ
 वेलची पूड, सुंठपूड
 गरजेनुसार दूध आणि तळण्यासाठी तूप
 
कृती :

   मुगाची डाळ धुवून कमी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी, पोहे धुवून पिळून पाणी काढून टाकावे, परातीत तादळाच पीठ घेऊन त्यात भिजवलेले पोहे, शिजलेली मूग डाळ एकत्र करावी त्यात किसलेला गूळ, वेलची पूड, सुठपूड, चिमूटभर मीठ, तीळ आणि लोणी घालावे. मिश्रण कोरड वाटल्यास थोड़ दूध टाकून पिठाप्रमाणेच पीठ तयार कराव पीठ चांगल एकजीव झाल्यावर चकलीच्या सोऱ्यात घालून त्याच्या चकल्या पाडाव्या. तूप तापवून कडकडीत तुपात चकल्या टाकाव्यात. मंद आचेवर चकल्या बदामी रंगावर तळून काढाव्यात.

या चकल्या विशेष करून म्हैसूरमध्ये केल्या जातात!

मुरुकू






साहित्य : 

५०० ग्रॅम तांदूळ
२५० ग्रॅम उडीद
१ टे स्पू जिरे
१ टे स्पू. तीळ, हिंग
४ टे स्पू. पांढरे लोणी, मीठ
तळण्यासाठी खोबरेल तेल किंवा आपल्या आवडीप्रमाणे कोणतंही खाण्याचं तेल.

कृती :

  तांदूळ धुवून वाळवून थोडे भाजून घ्यावे, मग भिजवून ठेवावे अर्ध्या तासानं तांदूळ उपसून निथळत ठेवावे कमीत कमी प्राण्यात वाटून घ्यावे उडीद डाळ कोरडीच बदामी रंगावर भाजून घ्यावी त्याचा मिक्सरमधून बारीक रवा करावा तांदळाची पिठी, उडीद डाळीचा रवा, जिरे, हिंग, तीळ आणि मीठ एकत्र करून त्यात लोणी मिक्स करावं मग गरजेनुसार त्यात पाणी घालून मिश्रण सैलसर भिजवाव प्रथम हाताला तेल लावावं पिठाची लिंबाएवढी गोळी घेऊन ती थोडी लांबट ओढून घ्यावी पिठाची लिंबाएवढी गोळी घेऊन हाताला तेल लावून थोडी लांबट करून ओढावी नंतर दोन्ही हातानी पीळ द्यावा असे करून चकलीप्रमाणे दोन-तीन वेढे घालावे याप्रकारे आधी मुरुक्कू तयार करून ठेवावे आणि नंतर कढईत तेल तापवून बदामी रंगावर तळावे




सुरळी होलिगी



(कर्नाटकातला हा अगदी विशेष पदार्थ आहे. )

साहित्य :

पारीसाठी २ वाटी मैदा
१ वाटी रवा
चिमूटभर मीठ आणि २ टे स्पू पातळ तूप

सारणासाठी :

  १ वाटी डाळ्या
  अर्धी वाटी पिठीसाखर
  अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  वेलची पूड आणि खसखस

कृती :

  खसखस भाजून घ्यावी, डाळ्या, खसखस, पिठीसाखर, खोबऱ्याचे कीस आणि वेलची पूड सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावं मैदा, रवा, मीठ आणि तूप परातीत घेऊन पाण्यानं घट्ट भिजवावं पीठ भिजवून दोन तास झाकून ठेवावं पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन पातळ लाटावा त्यावर तयार केलेलं सारण मधोमध ठेवावं. सारण सर्व बाजूंनी सारखं करून पारीची एक इंचाची सुरळी तयार करावी सुरळीची दोन्ही टोके दाबून बद करावी सुरळीला हातानं दाब देऊन ती थोडी पसरवून घ्यावी सर्व सुरळ्या तयार करून तव्यावर दाबून शेकून घ्याव्या किंवा गरम तुपात मध्यम आचेवर तळाव्या त्या बरेच दिवस टिकतात

राजस्थानी बर्फी



साहित्य :
  • अर्धा किलो बेसन
  •  तूप
  • अर्धा किलो साखर
  •  बेदाणा, वेलची
  •  रंग

कृती :

  प्रथम बेताल मुठी वळेपर्यंत गरम तुपाचे मोहन घालावे. दुधात भिजवून तासभर आधी ठेवावे. तीनतारी साखरेचा पाक करून ठेवावा व रंग थोडा घालावा, बेदाणा, वेलची पण घालावी. नंतर भिजलेले पीठ तुपाचा हात लावून मळून घ्यावे व त्याचा गोळा करून मुठी बळाव्या. सर्व मुठी तुपात लाल तळून घ्याव्यात. नंतर चाळणीत काढून घ्याव्यात. म्हणजे कोरड्या होतील. खलबत्यात बारीक कुटून नंतर तारेच्या चाळणीत बारीक चाळून घ्यावे व हा रखा तुपात पुन्हा लाल भाजून घ्यावा व पाकात घालून ढवळून एकजीव करावा. नंतर ताटाला तूप लावून गोळा थाटावा, वर सोनेरी किंवा सिल्व्हर (वर्ख) चालावे. अर्ध्या तासाने सुरीने बर्फी कापावी. ताटापेक्षा ट्रे मध्ये गोळा आपला तर वड्या सरळच्या सरळ न तुटता चांगल्या निघतात. ही बर्फी खाण्यास व दिसण्यास सुंदर शिवाय खवा न घालताही त्याची चव विशेष असते. दिवाळीत ही बर्फी सर्वांना निश्चितच आवडेल.

इंद्रधनुषी करंज्या

 


साहित्य :

एक वाटी रवा
एक वाटी मैदा
एक नारळ
दोन वाट्या साखर
एक चमचा तांदळाची पिठी
अर्धी वाटी तूप
पाच चमचे कॉर्नफ्लोअर
 दूध, वेलची पूड
 गुलाबाचा इसेन्स हवे ते खाण्याचे रंग.

कृती :

 नारळ (ओले) खोवून घेऊन खोबरे आणि साखर एकत्र शिजवावे. शिजत आल्यावर त्यात एक चमचा तांदळाची पिठी घालून पूर्ण शिजवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पूड व गुलाबाचा इसेन्स घालावा व सारण तपार करून ठेवावे. स्वा व मैदा एकत्र करून त्यात चार चमचे तूप मिसळावे. त्या पिठाचे दोन भाग करावेत. एका भागात हवा असेल तो खाण्याचा रंग घालावा व दोन्ही भाग दुधात किंवा पाण्यात वेगवेगळे घट्ट भिजवावे. दोन तासानंतर ते गोळे कुटून घ्यावेत, अर्धी वाटी तूप घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर चांगले फेसून घ्यावे.
      पांढऱ्या पिठाच्या गोळ्याचा चार लहान गोळ्या कराव्यात. तसेच रंगीत पिठाच्या गोळ्याच्याही चार गोळ्या कराव्या. नंतर पांढरी एक गोळी घेऊन ती लाटून त्यावर फेसलेले कॉर्नफ्लोअर लावावे. रंगीत गोळीची पोळी लाटून ती पांढऱ्या पोळीवर पसरावी व रंगीत पोळी वर कॉर्नफ्लोअर लावावे. याप्रमाणे चार रंगीत पोळ्या कॉर्नफ्लोअर लावलेल्या चार पांढन्या पोळीवर पसरवून, प्रत्येकीवर कॉर्नफ्लोअर लावून त्या सर्व पोळ्यांची मिळून गुंडाळी करावी. ती गुंडाळी लांबीच्या बाजूने कापून दोन भाग करावेत व ते पुन्हा आडवे कापून दोन-दोन इंचाचे तुकडे करावेत. एक तुकडा घेऊन ज्याचे पदर दिसतात. ती बाजू पोळपाटाकडे करून गोळी पुरीसारखी लाटावी. त्यात वर तयार केलेले सारण भरून दोन्ही बाजू दाबून बंद करून कातणीने कातून मंद तुपात तळावी. पांढऱ्या व रंगीत अशा मिश्र पट्ट्यामुळे या आकर्षक दिसतात.
     वर एकच रंग घालण्याबद्दल दिले आहे. त्याऐवजी रे घालण्याकरिता जो पिठाचा भाग बाजूला काढलेला असेल. त्या भागाचे पुन्हा चार भाग करावेत व त्या प्रत्येक भागात निरनिराळे चार रंग घालावेत व चारही गोळ्यांच्या निरनिराळ्या पोळ्या लाटून एक पांढरी व दुसरीदुसऱ्या रंगाची, अशा सर्व पोळ्या एकमेकावर पसरवून करंज्या कराव्यात. या करंजीला निरनिराळ्या रंगाच्या पट्टेवजा छटा आल्यामुळे, करंजी इंद्रधनुष्याप्रमाणे दिसेल. रंगाच्या विविधतेमुळे या करंज्या फार आकर्षक दिसतात. याप्रकारच्या करंज्या अतिशय खुसखुशीत होतात. दिवाळीला या आकर्षक शोभिवंत रंगीत करंज्या सर्वांना खचितच आवडतील. साध्या करंज्या नेहमीच करतो. म्हणून या नाविन्यपूर्ण करंज्या जरूर करा.

मिश्र पिठाचे वडे



उद्याच्या मेनूसाठी खरेदी :

 पाल्यासकट मुळे, सत्री, चिंच, गूळ, कारली, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, बेसन, खायचा सोडा, ज्वारी-बाजरी पीठ, तादूळाचे पीठ, डबल बी. 
 
उद्यासाठी आजची तयारी :
  दाण्याचे कूट करावे, डबल बी भिजवावी

सकाळचा नाश्ता : 
 मिक्स पीठांचे वडे

जेवणाचा मेनू :
  मुळ्याच्या पाल्याची परतून चटणी, संत्र्याच रायत, चिंच+गूळ घालून कारल्याची भाजी, डबल बीची उसळ, कढी, साधाभात पोळ्या

मिक्स पीठांचे वडे साहित्य :

एक वाटी डाळीचे पीठ
एक वाटी मिक्स ज्वारी-बाजरी पीठ
अर्धी वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी तादूळाचे पीठ
दोन मूठी चिरलेली कोथिंबीर
एक चमचा लाल तिखट
दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे
सात-आठ लसूण पाकळ्या चिरून
दोन चमचे काळा मसाला
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिर
 अर्धा चमचा खायचा सोडा
 भाजीचा डाव भरून गरम तेलाचं मोहन
  चवीपुरते मीठ 
 
कृती :

वरील सर्व साहित्य वडे थापता येईल इतपत एकत्र भिजवावे. प्लास्टिकच्या कागदावर थापून गरम तेलात वडे तळावेत.

बटाटा वेफर्स



साहित्य :

  मोठे बटाटे आणि मीठ. 

 कृती : 

   बटाटे धुवून घ्यावे पातेल्यात घालून बुडतील इतपत पाणी आणि मीठ घालून ते शिजवावे. शिजवताना बटाटे फार मऊ होणार नाही याची काळजी घ्यावी. बटाटे गार झाल्यावर ते सोलून घ्यावे. बटाटे वेफर्सच्या किसणीतून किसून प्लॅस्टिकच्या कागदावर मोकळे पसरावे चांगले वाळवून घ्यावे मीठ न घालता बटाट्यांचे वेफर्स करून त्याची कुटून पावडर करावी त्याचा शिरा किंवा डाळीच्या पिठाच्या लाडवाप्रमाणे लाडू करता येतात

मदूर वडा



साहित्य :

 १ वाटी तांदुळाचे पीठ
 अर्धी वाटी रवा, १ वाटी मैदा
 १ डाव हरभऱ्याची डाळ
 १ कांदा, ७-८ हिरव्या मिरच्या
 १ डाव दाण्याचे कुट, १ इंच आले
 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
 २ डाव खवलेला नारळ
 २ डाव गरम तेंलाचे मोहन
 मीठ

कृती :

  आदल्या दिवशी रात्री १ डाव हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजत घालावी. दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरवर बारीक वाटावी रवां कोरडा भाजून कांदा लांबट चिरावा. आलं, हिरव्या मिरच्यांचे वाटण करावे. एका मोठ्या बाऊलमध्ये तांदुळाचे पीठ, मैदा, रवा, वाटलेली हरभऱ्याची डाळ, लांबट चिरलेला कांदा, मिरची आल्याच वाटण, चिरलेली कोथिंबीर, चवीपुरत मीठ, दोन डाव गरम तेलाचे मोहन घालून सर्व एकत्र कालवावे. वडे थापता येतील इतपत पाणी घालून पीठ भिजवावे प्लास्टिकच्या कागदावर बेताच्या आकाराचे वडे थापून कढईत तेल गरम करून गोल्डन ब्राऊन रगाचे वडे तळावेत. नारळाच्या चटणीबरोबर गरम सर्व्ह करावे.

व्हेज कोल्हापुरी




साहित्य :

१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे
३/४ कप बटाटयाचे मोठे तुकडे (बटाटा सोलून)
१/२ कप कॉलीफ्लॉवरचे मध्यम तुरे (फ्रोझन)
१/२ कप हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप फरसबीचे
तुकडे (१ इंच) • १/२ कप कांदा, बारीक चिरून, १ कप टोमॅटो बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ ते दिड टेस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप ३ व ५)
२ टिस्पून साधं लाल तिखट, १/४ टिस्पून हळद • ६ टेस्पून तेल, २ टेस्पून कोल्हापूरी मसाला

इतर मसाले:

१/४ टिस्पून वेलची पावडर 
२ चिमटी लवंग पावडर
१/२ टिस्पून बडीशेप पावडर
१/२ टिस्पून दालचिनी पावडर १ चिमटी जायफळ पावडर
 चवीपुरते मिठ

कृती :

  • कढईत २ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट आणि टोमॅटो घालावा. मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा | मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून | मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
  • त्याच कढईत ३ टेस्पून तेल, मध्यम आचेवर गरम करावे त्यात हळद आणि १/२ टिस्पून काश्मिरी लाल | तिखट घालून लगेच फरसबी आणि बटाट्याचे तुकडे घालावे. मिक्स करून २ ते ३ वाफा काढाव्यात.बटाटे किंचीतच शिजू द्यावे. आच मोठी करून (बटाटे व तिखट करपणार नाही याची काळजी घ्यावी.) कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. आच मोठी ठेवल्याने तेल व्यवस्थित तापते आणि फोडणी चांगली बसते. मिश्रण निट ढवळून गरजेपुरते पाणी घालावे.• कढईतील मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. त्यात | कोल्हापूरी मसाला, बडीशेप पावडर, लवंग पावडर, दालचिनी पावडर, वेलचीपूड आणि चवीपुरते मिठ घालावे. गाजर, मटार आणि कॉलीफ्लॉवर घालावा.  मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. १० मिनीटे शिजवावे.
  •  भाजी तयार झाली कि १ ते दिड टिस्पून तेल १ फोडणीसाठीच्या कढल्यात गरम करावे. १ टेस्पून काश्मिरी लाल तिखट घालावे.

मटारची कचोरी



साहित्य :
 
१. सारणाचे ओले वाटाणे (मटारचे दाणे) दीड वाटी
२. किसलेले खोबरे दोन टेबलस्पून
३. मीठ अंदाजे, लसूण ५ ते ६ पाकळ्या 
४. गरम मसाला १ चमचा, हिरव्या मिरच्या ३ ते ४
५. लिंबू अर्धे, १ साखर टे.स्पून 
६. तेल तळण्यासाठी व फोडणीसाठी. 

पारीसाठी :

 उकडलेला बटाटा किसून दीड वाटी, डाळीचे पीठ दोन टे.स्पून, किसलेले आले १ टे.स्पून, ओल्या मिरच्या चार, मीठ चवीनुसार.

कृती (सारण) :

  वाटाणा अर्धवट बारीक करून घ्यावा. नंतर त्यात लसूण, मिरची, आले वाटून घालावे. तेलाची फोडणी करून त्यात वाटाणा मिश्रण, मीठ, गरम मसाला, साखर, खोबरे (किसलेले) घालावे व मिश्रण चांगले परतावे.

(पारी) :
  बटाट्याच्या किसात मीठ, आले-मिरची पेस्ट, डाळीचे पीठ घालून मिश्रण एकजीव करावे. या पिठाच्या पाऱ्या कराव्यात. एका पारीवर सारण घालावे, वर दुसरी पारी ठेवून दोन्ही बाजू बंद कराव्यात किंवा मुरड घालून छान डिझाइनही करता येते मंद आचेवर कचोरी तळावी. कचोरी खाण्यास तयार. चटणी सॉसबरोबर खावी.

उपवासाचे डोसे





साहित्य:

१. ३-४ बटाटे, एक ग्लास भगर,.
२. हिरवी मिरची
३. चवीपुरते मीठ (उपवासाचे)
४. थोडेसे तूप. 


कृती-

 सुरुवातीला एक ग्लास भगर ५-६ तासभिजवावी. नंतर भगरीत थोडे-थोडे पाणी टाकून भगर मिक्समधून बारीक वाटून घ्यावी. ३-४ उकडलेले बटाटे बारीक करून वाटलेल्या भगरीत मिक्स करावेत, ४-५ हिरव्या मिरचीची पेस्ट व चवीपुरते मीठही त्यात मिक्स करावे. डोशाच्या तव्याला थोडेसे तूप लावून डोसा बनवावा. त्यानंतरचे डोसे बनवताना तव्याला तूप लावू नये.






Upvasacha shira (वरी तांदुळाचा शिरा )

vari tandulacha shira

चंद्रपुरी वडाभात




साहित्य:

१. प्रत्येकी अर्धी वाटी चणा
२. व मटकी डाळ
३. मूठभर तांदूळ, तूर, लाख
४. दोन वाट्या बासमती तांदूळ
५. आले, हिरवी मिरची, आठ लसूण पाकळ्या
६. कढीपत्ता, हिंग, मीठ, हळद, ओवा, तीळ, तेल
७. गोड ताक, लिंबाचे लोणचे, पापड.

कृती : 

 प्रथम सर्व डाळी वेगवेगळ्या भांड्यांत भिजत घाला. (४ तास) भिजल्यानंतर स्वच्छ धुऊन चाळणीत निथळायला ठेवा. निथळल्यावर पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. (फार बारीक नाही.) वाटताना त्यात आले, हिरवी मिरची, कढीपत्ता घाला (आवडीनुसार). वाटून झाल्यावर त्यात गरम तेलाचे मोहन, हिंग, हळद, मीठ, ओवा, तीळ घालून चांगले फेटून घ्या. तेलाचा हात लावून चपटे वडे थापा व मंद आचेवर वडे तळून घ्या. बासमती तांदळाचा कमी पाणी घालून भात शिजवून घ्या. शिजताना मीठ व थोडी हळद घाला. हिंगाच्या फोडणीचे तेल करा.
गरम भातावर वडे कुस्करून त्यावर हिंगाच्या फोडणीचे तेल घ्या. भाताबरोबर गोड ताक, लिंबाचे लोणचे, पापड घ्या.

व्हेजिटेबल खिचडी




उद्याच्या मेनूसाठी खरेदी:

१. पाव, गाजर, फरसबी, टोमॅटो, लाल मिरच्या
२. कांदे, मटार, कोथिंबीरीची जुडी
३. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कढीपत्ता
४ धने-जिरे पूड, गरम मसाला
५. लवंगा, तमालपत्र, सकाळचा नाश्ता : पाव वडा

जेवणाचा मेनू : 

लाल मिरची+कांदा+लसूण पातळ चटणी, मसाला पापड, कांद्याची पीठ पेरून भाजी, कढी, कोथिंबीरीच्या वड्या, •व्हेजिटेबल खिचडी, पोळ्या

व्हेजिटेबल खिचडी-साहित्य :

१. पाऊण वाटी तांदूळ
२. एक वाटीमूगाची डाळ, गाजर, फरसबीचे तुकडे
३. कांदा आणि बटाटा सगळं पातळ चिरून प्रत्येकी अर्धी ४. वाटी एक वाटी मटार दाणे
५. दोन टोमॅटो, कढीपत्ता, धने+जिरं पूड
६. दोन-तीन लवंगा, दोन पान तमालपत्र
७. अर्धा चमचा गरम मसाला
८. तेल

कृती : 

 अर्धा तास आधी डाळ, तांदूळ आणि भाज्या चिरून धुऊन ठेवाव्या. पातेल्यात दोन डाव तेल घेऊन हिंग+ मोहरी+हळदीची फोडणी करून त्यात तमालपत्र, लवंगा, कढीपत्ता घातल्यावर कांदा टाकून लालसर परतावे. नंतर डाळ-तांदूळ घालून परतावे. नंतर टोमॅटो, सर्व भाज्या घालून थोडे परतल्यावर त्यावर पाच वाट्या उकळीचे पाणी घालावे. त्यावर अर्धा चमचा धने-जिरे पूड, गरम मसाला, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर घालून उकळी आल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर खिचडी शिजवावी. घट्ट किंवा पातळ जशी हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालावे. साजूक तूप घालून सर्व्ह करावी.

तिळाची चटणी


 साहित्य- 

१) पांढरे तीळ एक वाटी दही एक वाटी, 

२) हिरव्या मिरच्या, 

३) मीठ-जिरे, 

४) कढीपत्त्याचे पान, 

५) उडीद डाळ दोन टे. स्पू. 

६)कोथिंबीर,


कृती -

 तीळ व उडीद डाळ वेगवेगळी खमंग भाजून घ्या वरील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्या. आवडत असल्यास तेलात हिंग-मोहरी जिरेची फोडणी करून वरून टाका आणि एकत्र करून घ्या.

तिळाचे झटपट लाडू


 साहित्य - 

१) तीळ दोन वाटी, 

२) एक टे. स्पू. तूप, 

३) १ वाटी पंढरपुरी डाळ्या, 

४) एक वाटी शेंगदाणे, 

५) एक वाटी पिठीसाखर, 

६) अर्धी वाटी किसलेले गूळ, 

७) वेलची पूड.


कृती - 

तीळ-शेंगदाणे वेगवेगळे भाजून घ्या. डाळ्या, शेंगदाणे, तिळाचे कूट करून घ्या. कूट करून परातीत वरील सर्व साहित्य घेऊन चांगले मिक्स करून घ्या. गरजेनुसार पातळ तूप मिक्स करा. लाडू वळवून घ्या. आवडीनुसार चारोळ्या किंवा सुका मेवाही यात घालू शकता.

Til dryfruit ladoo ( तिळगुळ ड्रायफ्रूट लाडू )




 साहित्य - 

१) दोन वाट्या पांढरे तीळ

२) एक वाटी जाड पोह

३) दोन टे स्पू

४) काजूचे काप

५) दोन टे स्पू. बदामाचे काप

६) दोन टे स्पू. पिस्त्याचे काप

७) दोन टे स्पू चारोळ्या

८) दोन टे स्पू. डिंक

९) सुंठ पावडर एक टे. स्पू.

१०) १ टी स्पू वेलची पूड

११) एक टी स्पू जायफळ पूड

१२) तूप

१३) गूळ


कृती -

कढईत प्रथम तीळ कोरडी भाजून घ्या तुपात पोहे डिक-काजू-बदाम-पिस्त्याचे काप - चारोळ्या तळून घ्या परातीत तळलेले पदार्थ घेऊन त्यात तीळ-सुंठ पावडर, जायफळ-वेलची पूड • टाकून मिक्स करा गरजेप्रमाणे किंवा चवीनुसार गूळ किसून घ्या सर्व एकत्र करून दोन्ही हातांनी मिसळून घ्या गरजेप्रमाणे तूप पातळ करून | मिक्स करावे आणि लाडू वळवावेत थंडीच्या दिवसांत हे लाडू गुणकारी व फायदेशीर ठरतात.



Bread Rolls (ब्रेड रोल्स)

 




साहित्य : 

१) स्लाइस असलेला ब्रेड

२) उकडलेले बटाटे

३) मीठ

४) मिरच्या 

५) कोथिंबीर

६) थोडे आले

७)तळणीसाठी तेल.


कृती : 

ब्रेडच्या स्लाइसच्या कडा सुरीने कापून काढाव्यात ४-५ उकडलेले बटाटे सोलून घ्यावेत. नंतर किसावेत. त्यात आले मिरच्या बारीक वाटून घालावे. मीठ घालून व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सारण एकसारखे करावे. पसरट पातेल्यात पाणी घेऊन त्यात एकेक स्लाइस टाकावा. नंतर दोन्ही हातांनी तळव्यात स्लाइस दाबून पाणी काढून टाकावे. नंतर त्यावर बटाट्याचे सारण पसरवून गुंडाळी करावी. ब्रेड ओला झाल्याने गुंडाळी छान होते. कडा बंद कराव्यात. नंतर कढईत तेल तापवून रोल्स तळून काढावेत. छान कुरकुरीत होतात.



Paneer Gulshan ( पनीर गुलशन ( गोड पदार्थ ))



 

साहित्य :

१) १२०० ग्रॅम पनीर

२) १०० ग्रॅम पेठा

३) २ टेबलस्पून बारीक केलेले ड्रायफ्रूट्स

४) डेसिकेटेड खोबरे

५) अर्धी वाटी गुलकं.


कृती :

 पनीर आणि पेठा समभाग घेऊन ते किसावे व चांगले मिसळावे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालावेत. नंतर त्याचा थोडासा गोळा घेऊन त्याची पारी करून त्यामध्ये पाव चमचा गुलकंद भरून पारी गोलाकार करून गोळा बनवावा व हा गोल गोळा डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये घोळवावा. अशा पद्धतीने सर्व पनीर गुलशन तयार करावेत. चटपटीत तिखट पदार्थांबरोबर हा गोड पदार्थ सर्व्ह करावा.




Katlet (कटलेट - मिश्र भाज्यांचे कटलेटस् )

 




साहित्य : 

१) उकडलेले बटाटे मोठ्या आकाराचे दोन

२) शिजवलेला पालक पाव वाटी 

३) बारीक चिरलेल्या कोबी

४) फ्लॉवर २ वाट्या

५) गाजर २ वाट्या

६) कांदा २ वाट्या

७) अर्धी वाटी उकडलेला व भरडसर वाटलेला मटार

८) ब्रेडचा चुरा १ वाटी

९) हिरव्या मिरच्या १० ते १२ 

१०) किसलेले आले १ टे.स्पून

११) मीठ चवीनुसार

१२) तूप किंवा तेल ४ टेबलस्पून.


कृती  -

चिरलेल्या भाज्या वाफवून घ्याव्यात. मिरच्या : बारीक वाटून घ्याव्यात. बटाट्याचा चुरा करून त्यात वाटलेली मिरची, पालक, मीठ व वाफवलेल्या भाज्या, आले, मटार घालून चांगले एकत्र करावे. साच्यामध्ये घालून तयार गोळ्याला आवडेल तसा आकार द्यावा. ब्रेडच्या चुऱ्यात घोळून फ्रायपॅनमध्ये तेल किंवा तूप घालून मंद आचेवर गुलाबी रंगावर कटलेट फ्राय करावेत. पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर खावेत.




Tilachya mau vadya (तिळाच्या मऊ वड्या)



 साहित्य - 

१) चार वाटी तीळ, 

२) दोन वाटी पिठीसाखर किंवा किसलेला गूळ, 

३) वेलची पूड, 

४) साजूक तूप, 

५) किसलेले खोबरे दोन टे. स्पू.


कृती - 

तीळ स्वच्छ धुवून वाळवून-खमंग भाजून घ्या, मिक्सरमधून फिरवून कूट करून घ्या. तिळाचे कूट, पिठीसाखर/गूळ व गरजेप्रमाणे तूप घाला. त्यात वेलची पूड घाला. एका ताटलीत तूप लावून वरील मिश्रण पसरवा वरती खोबरे पसरवून हातांनी दापून घट्टसर करा. वड्या पाडा. या वड्या मऊ व खमंग लागतात





Kaju Wadi (काजू वडी)

 



साहित्य :

१) काजूची पूड दोन वाट्या, 
२)साखर दीड वाटी, 
३)चीझ दोन चमचे,
४) साजूक तूप चार चमचे.

कृती : 

मध्यम आचेवर कढई तापत ठेवावी. त्यात दीड वाटी साखर पूर्ण बुडेल इतके पाणी घालून आच वाढवावी. मिश्रण चांगले उकळू द्यावे. अधूनमधून कालथ्याने ढवळत राहावे. एकतारी पाक झाला की त्यात साजूक तूप, चीझ व काजूची पूड घालून ढवळावे. हे मिश्रण सारखे ढवळत राहावे. काही वेळाने हे सर्व मिश्रण एकसंध होते. एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण ढवळावे. ताटलीला तुपाचा हात लावून मिश्रण ओतावे. ताटलीभर पसरून एकसारखे करावे. मिश्रण ओतल्यावर लगेच कोरडे पडते. त्यामुळे कोमट असतानाच वड्या पाडाव्यात. वड्या काढताना हलक्या हाताने काढाव्यात.